आयुष्य तेच नाही हे ही खरेच आहे
आहे तसेच काही हे ही खरेच आहे
पंख्यास एक पाते कुरकूर ना तरीही
वारा बळेच वाही हे ही खरेच आहे
आवळु नको खिळ्याला ठोकून बसव त्याला
त्याच्यात पेच नाही हे ही खरेच आहे
अवसेस मध्यरात्री मजला धरा म्हणाली
अंधार वेच राही हे ही खरेच आहे
हातात येत नाही म्हणुनी म्हणे सुनेत्रा
चिमटून खेच बाही हे ही खरेच आहे