मम आत्म्यावर माझी प्रीती स्वभाव माझा
नेणिवेतले आठवण्या ना सराव माझा
मनापासुनी जे जे शिकले आठवेल मज
सुयोग्य समयी सहज व्हावया उठाव माझा
दिशादिशातुन वादळ येता पार व्हावया
मला कधीही नडला नाही विभाव माझा
कुटी हवेली शेत बंगला याहुन जिवलग
काया माझी या जन्मातिल पडाव माझा
मी न मांडला मी न मोडला फक्त पाहिला
तुझियासाठी तूच मांडला न डाव माझा
खोऱ्यामधले खोऱ्याने तू पीक ओढता
हिमनग फोडे खणखण वाजत टिकाव माझा
गझलेमधला रदीफ माझा म्हणजे आत्मा
विदेहक्षेत्री शक्यच नाही लिलाव माझा