फुका कधी ना वाढविते मी भाव माझिया भावाचा
अर्थपूर्ण मम गझल उमलते होत काफिया भावाचा
लयीत येती शब्द नाचरे रदीफ होण्या गझलेचा
परिमल पसरव गझल फुलांतिल तूच वारिया भावाचा
कर्माष्टक जाळून तपाने हिशेब चुकता करुन पुरा
देवगुणांच्या टोळीमधला मुक्त डाकिया भावाचा
आंतरजाली फिरता रमता कर्मास्रव झाल्यावरती
अंतरातही जाळे विणतो सुबक कोळिया भावाचा
देहमंदिरी आत्मा माझा त्याला वंदन करते मी
संधीकाली होण्यासाठी खाक कालिया भावाचा डाकिया