आग आहे आग मी
पूर्ण सुंदर राग मी
छप्परांना तोलते
काष्ठ मजबुत साग मी
चुगलखोरी भोवता
अंध म्हणती डाग मी
माल कच्चा जाळण्या
यज्ञ आणिक याग मी
मूढता नच कोडगी
अंतरीची जाग मी
परिमलाने धुंदलेली
मोगऱ्याची बाग मी
वेगळेपण जाणते
न वेंधळी न काग मी
ना करे रे आजही
व्यर्थ भागं भाग मी
ऐक माझी भैरवी
केतकीतिल नाग मी
का लिहू मक्ता इथे
गझलरूपी फाग मी