बिटवी – BITVEE


भाग्य लिहाया भाळावरती कधी न येते सटवी बिटवी
उडता उडता हेच सांगते टिवटिवणारी टिटवी बिटवी

मकर संक्रमण सणास कोणी जित्राबांना हाकत येता
किराण्यातले वाण लुटूनी अंधाराला पटवी बिटवी

नको जीम अन नकोच डायट कामे करते मस्त जेवते
रहाट ओढून पाणी भरते वजन बरोबर घटवी बिटवी

फटाकडी ना बॉम्ब फटाका वाहन भारी तयात बसुनी
मजेत सारी गावे फिरते मुळी न ती हो नटवी बिटवी

अडल्या नडल्या मुक्या जिवांना चारापाणी देते हसते
दारी येता चोर भामटे युक्तीने त्यां कटवी बिटवी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.