रूट कॉज काय खरे कळव बरे
टाळशील तेच स्मरे कळव बरे
चांदण्यात सत्य खिरे झरे उरे
का भुजंग मौन वरे कळव बरे
वावरात गच्च धुके गडद निळे
अंतरात नाद भरे कळव बरे
प्रश्न नेमका न कुणी पुसे मला
पूस तोच तू मज रे कळव बरे
ऐकण्यास तीच जुनी अलक पुन्हा
कोण नित्य हट्ट धरे कळव बरे
शब्दार्थ
रूट कॉज – मूळ कारण
अलक – अति लघुत्तम कथा