जिना बिलोरी लवचिक मजबुत
जिना चढूया मजेत मजबुत
वळणावरती मंचक झुलता
जिना वळतसे गर्कन मजबुत
वळणे वळसे घेता घेता
जिना बनतसे अजून मजबुत
स्याद्वादाची सलील शैली
जिना पेलतो डोलत मजबुत
टोक गाठुनी न्याहाळत भू
जिना थबकतो वळून मजबुत
वर्तमान अन भूत संगरी
जिना आजपण तसाच मजबुत
भविष्य लिहितो स्वतः स्वतःचे
जिना म्हणे मी खरेच मजबुत