किती ऊन सोने सांडते उन्हाळी
काया घाम गाळे वेचून वेचून
उन्हाचे चांदणे उन्हाचा पाऊस
पेरण्या अक्षरे लेखणी झरेल
ऊन सावलीत सावली उन्हात
सावली रापते गव्हाळते ऊन
झाकोळता नभ ऊन काळवंडे
गर्द कडुनिंब त्याला वारा घाले
गोधन गोठ्यात वाहने सुसाट
उंबऱ्यात बाळ पाहतेय वाट
ऊन काळगेले सांज गोरीमोरी
धुळीत खेळून उभी शांत दारी
संधिकाली तूप साजुक दिव्यात
जिनबिंबी स्व चे न्याहळण्या रूप