अरे माणसा हा झमेला कसा रे
कर्म बांधतो तो अकेला कसा रे
जरी खाक लंका पुरी जाहलीया
वाचला जिनांचाच ठेला कसा रे
बिटरघोर्ड म्हणते जरी कारल्याला
तरी शब्द घेते करेला कसा रे
न घोडे न घोड्या न राऊत कोणी
इथे हा ऊभा मग तबेला कसा रे
अवतार घेऊन प्रसादास लाटे
तुझा देव इतुका भुकेला कसा रे