मुक्तक – पाट्याचा पारा
वाट्याला आले, तेच वाटते बाई..
वाटाया मिरच्या, वरवंट्याची घाई..
कंकणे वाजता, किणकिण ठाई ठाई..
पाट्याचा पारा उतरत उतरत जाई..
रुबाई – जैन संस्कृती
आत्महितास्तव परहित करुनी गगन चुंबते जैन संस्कृती
हृदयामधली प्राकृत बोली अधरी जपते जैन संस्कृती
घन मालांतुन उदक वर्षते चिंब भिजविण्या सुकल्या गात्रा
उगाळेन चंदन प्रीतीचे सहज जुळाव्या अक्षर मात्रा