सोड – SOD


पडलं ! कुठलं ! घोडं .. बाई घोडं !
पडलं ! सुटलं ! कोडं .. बाई घोडं !

बघुन हिरवं रान, गाया गाणं !
पडलं ! बसलं ! थोडं ..बाई घोडं !

धरलं म्हणुन, आलं हाती सोनं !
पडलं ! पुजुन ! जोडं.. बाई घोडं !

“धन उधळत”, बोल म्हणता वात !
पडलं ! हसलं ! गोड.. बाई घोडं !

लिहुन दमलं नाय ! फटका खाय !
पडलं ! म्हणत, सोड.. बाई घोडं !

शब्दार्थ :
घोडं – घोडे( घोडा /घोडी)
कोडं – कोडे, हुमान
गाया – गाण्यासाठी
गाणं – गाणे,गीत
थोडं – थोडावेळ
सोनं – सोने, एक मौल्यवान धातू
आलं – आले (क्रियापद)
जोडं – जोडे, वहाणा
वात – वारा
गोड – मधुर
खाय – खाल्ला, खाऊन
नाय – नाही
सोड – सोडुन दे

लगावली- ललल/ ललल/ गाल/गागा/गाल/
मात्रा- १६


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.