लोक हे दिसले न पूर्ण विरक्त मजला
वाटले काही तरी पण सक्त मजला
प्राशुनी माधुर्य गझले पश्चिमेसम
सांजसमयी व्हायचे आरक्त मजला
जोगवा मागे न पाळे मी तिथीही
का तरी म्हणतात कोणी भक्त मजला
आवडे मज मम मुठीतुन विश्व बघणे
मौन म्हणते राहुदे अव्यक्त मजला
ही बरी की ती सुनेत्रा काय सांगू
जी खरी ती भावते रे फक्त मजला