हले काळीज स्पंदनी जशी वारियाने वात
निरांजनी स्नेहधार तेवतेय शांत शांत
शांत कारुण्य रसात भिजलेली नेत्र ज्योत
आई तुझ्या घरी माझा सूर पोचवितो वात
जाई जुई चमेलीचा गंध येतो गुलाबास
चिवचिव किलबिल पाखरांची शाळा खास
ये ग आई माझ्या घरी होउनीया गोड बाळ
काय टाकू ओवाळून तुझ्यापुढे म्हणे काळ