मन मांडते बाजार ..बाजारात रमे फार
मन पाळते व्यवहार … बाजारात फिरे फार
तन स्वच्छता पाळते … देव्हाऱ्यात देव दिवा
मन शोधते आधार … बाजारात बसे फार
घन वर्षती भूवरी … रान झाले चिंब चिंब
मन करते व्यापार … बाजारात विके फार
पण परंतू गाजले … शब्द काव्य भांडारात
मन गुंफते रे हार … बाजारात टिके फार
वन काय गीत गाई … ऐकतात पक्षी बाई
मन भरते कोठार… बाजारात फळे फार