विटी कोलली वाकड झाली
झोप उडाली झापड झाली
लाट लाटली इतुकी पातळ
तळून पोळी पापड झाली
बारा वाजुन गेल्यावरती
कशी आरती काकड झाली
कणकेमधुनी मोहन गायब
शिळी चपाती वातड झाली
खच्चुन भरला मिथ्य मसाला
कथा मूळची भाकड झाली
जगी मिरविण्या घेतलीस जी
जबाबदारी कावड झाली
जिन धर्माची ध्वजा पेलण्या
आज सुनेत्रा धाकड झाली