रंग रूप आरसा मनाचा
तृप्त कृष्ण घन तसा मनाचा
कोण डाव खेळते कुणाशी
रंग गडद बघ तसा मनाचा
शीळ वात घालता मजेने
धाव घेतसे ससा मनाचा
शिंपल्यात दो झरे वसंती
गझल उधळते पसा मनाचा
गाल गालगा लगा सुनेत्रा
सहज पेलते वसा मनाचा
रंग रूप आरसा मनाचा
तृप्त कृष्ण घन तसा मनाचा
कोण डाव खेळते कुणाशी
रंग गडद बघ तसा मनाचा
शीळ वात घालता मजेने
धाव घेतसे ससा मनाचा
शिंपल्यात दो झरे वसंती
गझल उधळते पसा मनाचा
गाल गालगा लगा सुनेत्रा
सहज पेलते वसा मनाचा