पैठणी – PAITHANI


हलकी फुलकी नवी पैठणी
स्वाभिमान जागवी पैठणी

किणकिण मंजुळ नाजुक घंटा
सोळाकारण हवी पैठणी

रत्नत्रय धन जिनानुयायी
कूळ मिरविते कवी पैठणी

गवळण गरगर करात फिरवत
मंथन करते रवी पैठणी

मोरपिशी इरकली वहीवर
कुसुमांकित माधवी पैठणी

कवयित्री क्षत्राणी नारी
मृदुल पात पालवी पैठणी

पहाटवाऱ्याने सळसळते
भिजते सुकते दवी पैठणी

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.