आठवतो मज माझा कुरळ्या जावळातला मुन्ना मर्फी
आठवते मज माझी गुबरी लेक बाहुली मुन्नी बर्फी
मोठा झाला शिकला घडला संस्कारानी जिनधर्माच्या
सत्य अहिंसा जपण्यासाठी लढला मुलगा मुन्ना मर्फी
मोठी झाली कन्या शिकली गुपित जाणुनी स्वधर्म जपूनी
कुटुंब अपुले सुखी व्हावया लढली मुलगी मुन्नी बर्फी
कुटुंब अमुचे समृद्धीने धनधान्याने भरून वाहण्या
वाहन घर धन जमीन जुमला मिळवुन हसतो मुन्ना मर्फी
सुरक्षित अन पूर्ण निरामय स्वातंत्र्याने जगण्यासाठी
पूर्ण कुटुंबा ज्ञान देउनी कृतार्थ झाली मुन्नी बर्फी
सुंदर माझी सुदृढ मधुरा सुयोग्य तिजला पती मिळाला
यासाठी ती कृतज्ञ आहे मधुर बोलते मुन्नी बर्फी
निखील मधुरा जोडीची लेक गोडुली इरा बालिका
कृतार्थ झालो आम्ही सारे मुन्ना मर्फी मुन्नी बर्फी
सुदृढ सुंदर शशांक माझा सुयोग्य पत्नी मिळेल त्याला
पुढचे जीवन सुखशांतीमय होण्या लिहितो मुन्ना मर्फी
सुनेत्रातली आत्मसुंदरी सुभाषसंगे कृतज्ञ आहे
सून जाणती घरी नांदण्या स्वतःच झाली बर्फी मर्फी