उधळले घोडे रणी चौखूर आता
संयमाचा बदलला बघ नूर आता
आज मी पण या घडीला संकटांना
ठोकल्यावर जाहली ती चूर आता
मासळी बाजार नाही भरत देही
काजळेना लोचनांना धूर आता
लाभल्यावर दूरदृष्टी आत्मश्रद्धा
संपला तो काळही निष्ठूर आता
सांजवाती तेवताती मम सुनेत्री
अंतरी ना माजते काहूर आता