जपावी प्रीत संसारी फुका भणभण वणवण नको
नको ते दागिने शेती तुझी आंदण नको
जिवाला जीव देते हीच मम ओवाळणी
नको ते मेणबत्त्या फुंकणे औक्षण नको
कशाला दोष तव शोधून टिपणे रोजचे
तुझी तू चूक पकडावी फुका भांडण नको
गळावा लोभ रागी नाटकी वृत्तीतला
मनाने शांत व्हावे भटकणे वणवण नको
सुनेत्रा नाव माझे ठेवते स्मरणात मी
लिहावा शेर मक्त्याचा करी गोंदण नको