लीड घे ती म्हणाली घेऊन ठेवले
टोक तुटता त्वरेने पकडून ठेवले
तासुनी ब्लेडने पेन्सीलीस कैकदा
टोकयंत्रात हलके फिरवून ठेवले
संपता क्षुद्र साऱ्या भोगून वासना
साबणाच्या जळी त्यां भिजवून ठेवले
पुद्गलाचे सुबकसे नाजूक खेळणे
खेळुनी खेळवूनी मांडून ठेवले
आठवांच्या सुनेत्रा सायीस विरजुनी
अर्थ लोण्याप्रमाणे कढवून ठेवले
वृत्त – अभयकांती
लगावली – गालगा/ गालगागा/गागाल/गालगा/