तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग कीर्तीवरी
काठ चुंबण्या लयीत विरती तरंग कीर्तीवरी
कैक भोवरे गरगर वरती बुडून येता क्षणी
नकळत उठते खळखळ सळसळ अनंग कीर्तीवरी
नाठाळाचे माथी काठी सम्यक श्रद्धा उरी
गाथांमध्ये तरंगणारी अभंग कीर्तीवरी
बिंब पहाया मुनीमनासम निर्मळ सरोवरी
बनी केतकी सुगंध उधळे दबंग कीर्तीवरी
फक्त माझिया आत्म्याला मी रक्ष रक्ष म्हणते
पाप पुण्य तव किती बहकले भणंग कीर्तीवरी