निर्मल मानस लुटते मी
णमो णमो पुटपुटते मी
पाप पुण्य तोलते तुला
शून्य बनूनी सुटते मी
अलगद फिरवुन बत्त्याला
खली वेलची कुटते मी
जलद दाटता गच्च नभी
जशी ढगफुटी फुटते मी
बंधमुक्त होऊन जगे
ताणत नाही तुटते मी
पचावयाला बाळांना
हलके आरारुट ते मी
पाण्यावर फिरवुन बोटे
सहज उमटते स्फुट ते मी