लवंग …आणि दोन मुक्तके
लवंग
जशी आमटी मस्त कटाची तवंग द्रव्यावरी
तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग द्रव्यावरी
भावमनाची होडी आली तरून काठावरी
अर्घ्य द्यावया पुष्प वाहिले लवंग पाण्यावरी
धाव
जपणे स्वभाव अपुला काव्यास पण जपावे
वृत्तात मांडताना काव्यास पण जपावे
घन शब्द अंतरीचे वाऱ्यासवे हलूनी
शेरात धाव घेता काव्यास पण जपावे
केतू
शनी असो वा मंगळ राहू केतू कुंडलीत
अंतर दीपक उजळे जीवन सेतू कुंडलीत
गुरू दिगंबर जिनालयी मम आतम आतम मंदिरात
आठ आठ अन दहा मात्रांस घे तू कुंडलीत