हातावरील रेषा रेखून राम गेला
वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला
जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे
परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला
पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा
रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला
लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या
बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला
मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा
भाकीत भेकडांचे उडवून बार गेला