सनत – SANAT


मम गोष्ट धोतऱ्याची देताच परत काही
त्यातील अर्थ कळण्या बसतात कुटत काही

झालेत संत सन्तच आघात’स’वर करूनी
जपण्या अलामतीला लिहितात सनत काही

मिळताच अर्थ’सा’ला ‘रे’ला जसा दिलेला
गझलेस गज्जलेची म्हणतात सवत काही

ते पान धोतराचे जोडीतले धुवोनी
गाळून उदक घेता जळतात धुपत काही

पानांत शोभणारे मृदु पुष्प धोतऱ्याचे
चाखावया विषाला फिरतात घुमत काही

कोणास गंड रामा पापड तळेल सीता
कढईत तेल कढता घडतात तळत काही

ही लेखणी शिशाची तासून धार दिधली
हातात घे ‘सुनेत्रा’टळतील वळत काही


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.