फुकट नसावी उठाठेव ही
विकत असावी उठाठेव ही
आत्महिताला जपत उमटली
मनी ठसावी उठाठेव ही
अहं जयाने फुका पोसला
त्यास लसावी उठाठेव ही
तुझीच नांगी तुझी वासना
तुला डसावी उठाठेव ही
नागिण सळसळ करत लहरता
गात हसावी उठाठेव ही
जरी उतरली नशा नाचरी
परत कसावी उठाठेव ही
हृदय जलाच्या तळी मंदिरी
शांत वसावी उठाठेव ही
तुझी उचापत तुला भोवली
इथुन खसावी उठाठेव ही
अर्ध्यावरती कुणी सोडता
नीट धसावी उठाठेव ही
हुमान मांजा दीन वावडी
ग आकसावी उठाठेव ही
लाथ कुणाला कुणास चिमटे
न फसफसावी उठाठेव ही
जिनास मानू जिना चढत हा
अरस रसावी उठाठेव ही
पूर्ण सुनेत्रा अभय व्हावया
न ठसठसावी उठाठेव ही