ही नोट आगळी नाही मम ताव आगळा आत्म्या
कार्माण वर्गणांचा जणु डाव आगळा आत्म्या
गझलेत युद्ध हे कसले झर वेगळे रमणी
तलवार रक्षिते जीवां मृदु घाव आगळा आत्म्या
देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार अन शेते
गावांस गाव पण आहे तव आगळा आत्म्या
नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे
वाटून पुण्य कर्मांना घन भाव आगळा आत्म्या
गाऊन जिनस्तुती लिहिते जीवांस जीवनी जगण्या
हृदयात शब्द ठेवा हा जल बाव आगळा आत्म्या