बघ नोट सावळी नाही मम ताव आगळा आत्म्या
कार्माण वर्गणा रेखू जणु डाव आगळा आत्म्या
गझलेत सामना करण्या झर शेर वेगळे रमणी
तलवार रक्षिते जीवा मृदु घाव आगळा आत्म्या
देऊळ चावडी शाळा वटवृक्ष पार राई
गावांस गावपण आहे तव गाव आगळा आत्म्या
नात्यात गोडवा जपण्या नक्षत्र टाळुनी बरसे
वाटून पुण्य कर्मांचे घन भाव आगळा आत्म्या
गाऊन जिनस्तुती लिहिते जीवांस जीवनी जगण्या
हृदयात अक्षरी ठेवा जलबाव आगळा आत्म्या
आनंद अंतरी डोही खळखळत वाहतो निर्झर
लंघून स्वार मी झाले घेराव आगळा आत्म्या
संगीत रंगत सुनेत्रा नाचून चिंब मन भिजते
मौनास बोलते करण्या धनु साव आगळा आत्म्या
मूर्तीत देव रे कोठे बिंबात बाव बाजारू
जिंकून हटवण्यासाठी पाडाव आगळा आत्म्या
मोजून औषधी मात्रा गागाल गाळगा गागा
तोलून भावना देते दे ठाव आगळा आत्म्या