व्यंजन “च” ना भरीचे हे पण खरेच रे
परिपूर्ण अर्थवाही नच ठेच टेचरे
सावज शिकार पारध शब्दांस जोडुनी
मी ताणले धनुष्या बाणात खेच रे
नाहीस तू जनावर माणूस जाणता
खुडतोस का कळ्यांना पुष्पांस वेच रे
बोटातल्या कलेचे लालित्य ओळखू
ठोकून काय होते पिळण्यास पेच रे
अर्था अनर्थ म्हणती कोंडून भावना
चैतन्यदा “सुनेत्रा” पाडा चरे चरे