अरेव्वा ! अरेव्वा ! किती सांग मात्रा ..
स्वराघात धरुनी किती सांग मात्रा
अरेवा!अरेवा !! असे ते म्हणाले
तुझ्या तू मतीने रती सांग मात्रा
अरेवा म्हणाले जरी लीलया मी
अरेवातल्या मज यती सांग मात्रा
स्वराघात रे वर न झाला जरी रे
अरेवातल्या रेवती सांग मात्रा
इथे रेव ठेव न फुका दाखवे भो
सुमक्त्यातल्या तू श्रुती सांग मात्रा