-
नको अवेळी चहा सख्या – NAKO AVELI CHAHA SAKHYA
This Ghazal is written fourteen matras. Radif of this Ghazal is Sakhya and Kafiyas are Chaha, Paha, Saha, Vaha, Raha, Naha. नको अवेळी चहा सख्या वेळ जरा तू पहा सख्या नाते अपुले नको असे तीनावर जणु सहा सख्या या जगण्याची लज्जत घे वाफ होउनी वहा सख्या मी प्याला की नीर मधुर माझ्यातच तू रहा सख्या…
-
सचैल काया – SACHAIL KAYA
Akasharganvrutta used in this Ghazal is LA GAA,LA GAA GAA, LA GAA, LA GAA GAA. Kafiyas used in this Ghazal are Bhijaya, Firaya, Dharaya etc. सुकून पुन्हा नको भिजाया उन्हात जारे अता फिराया जलात दिसता कुणी पुसटसे कशास जाते तया धराया फुलात आहे लपून कोणी अबोल प्रीतीसम भिजवाया तृषार्त हरिणी फसेल म्हणुनी मृगजळ लागे पहा…
-
बोल कंकणातले – BOL KANKANATALE
Akasharganvrutta used in this ghazal is GAA LA GAA LA, GAA LA GAA, GAA LA GAA LA, GAA LA GAA. ऐकते सख्या तुझे बोल कंकणातले पाहते सख्या तुझे बिंब आरशातले मी जरी मुकी मुकी ओठ घट्ट दाबुनी डोलतात कुंडले श्वास कुंडलातले कुरळ कुंतलांवरी भाळलास तू जरी मोजते पुन्हा पुन्हा वार काळजातले वाहतात नेत्र हे बोलतात…
-
अर्थ सांगू कसे मी कुणाला? – ARTHA SANGU KASE MEE KUNALA
This ghazal is written in Akasharganvrutta, GAA LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this Ghazal the poetess says, How can I explain My Ghazals? पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे…
-
कवच-कुंडले – KAVACH-KUNDALE
In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. this ghazal is written in 16 matras. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू…
-
केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा – KEVAL ATMA SUDDHA SUNETRA
This Ghazal is written in Matravrutta(16 matras). In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली
-
दर्शन – DARSHAN
This poem is known as Muktak. In this four lined poem it is described that how sweet and colourful fruits are! The poetess says, fragrance of jui flower, the cool breeze of air coming near her. दर्शन या मधुर पक्व फळांचे नयनी रेंगाळी अमृतासम चव केळीची जिभेवरी घोटाळी गंध जुईचा वेड लावतो झुळुक लपेटी तना…