Category: Ghazal

  • येरा – YERAA

    रमा बाई रान डेरा हिरवा गार गोल फेरा हिरवा गार गोल फेरा हिरवा गार गोल फेरा चला जाऊ फिरायाला लोणावळा खंडाळ्यास विमा माईची तवेरा हिरवा गार गोल फेरा पाखरांचे गोड गाणे ऐकूनिया छान छानच चिमा ताई देय शेरा हिरवा गार गोल फेरा लेकीसुना माहेरात त्यांच्या पीत घागऱ्याचा सुमा आई मोज घेरा हिरवा गार गोल फेरा…

  • दिलजमाई – DIL JAMAI

    धर्म अर्थातिल कमाई घागरीने ओत ज्येष्ठा बहरण्या ग्रंथी तराई घागरीने ओत ज्येष्ठा सागरी भुवनी वनी जलधार घुसळत मुसळ नाचे तैलचित्रातिल सवाई घागरीने ओत ज्येष्ठा कुमुदिनी निशिगंध चाफा मोगरा बकुळी सुगंधी व्हावयाला दिलजमाई घागरीने ओत ज्येष्ठा जलद भरता मोतियांनी मुक्तकांची माळ झरण्या मुक्तछंदातिल रुबाई घागरीने ओत ज्येष्ठा दाटता घन अक्षरांना तोलणारी मर्मग्राही जोहरी मी ना कसाई…

  • वाली – VAALEE

    मतलबी ना माय वाली राहण्या लेकरांसह शांत झाली राहण्या बाप जरका जाणता अन मान्यवर लेकरांचा खास वाली राहण्या आब राखूनी स्वतःचा जीवनी पारखाया राख ढाली राहण्या च्यायला अन चाय ला तिल फरक बघ ही शिवी शोभेल गाली राहण्या पुत्र जर आहे हवा तुज संयमी मेहुणी उजवेल साली राहण्या त्या तुझ्या खेळात खेळी खेळण्या काय मिळवे…

  • प्रीती – PRITI

    कागदी ना पुफ्फ माझी गझल तृष्णा सौरभावर तप्त झुकली अधर तृष्णा रसरसावी शेगडीतिल कोळशांवर सरकलेल्या झाकणातुन झरत तृष्णा गरगरूनी भोवऱ्यासम खुडत नुक्ते कळत नकळत टपटपावी कलश तृष्णा दे सुवर्णाला झळाळी फुलव भट्टी आग ज्वाळामालिनीतिल तलम तृष्णा का गजाने मोजता येते तग़ज्जुल.. जोडते प्रीती “सुनेत्रा” तरफ तृष्णा   `  

  • ग – GA

    कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा

  • ध्रुव – DHRUVA

    शुद्धात्मा मम आत्मा आहे सिद्धस्वरुप धन आत्मा आहे शरीर आत्मा वेगवेगळे ज्ञान चरित घन आत्मा आहे कर्म वर्गणा जरी बांधतो अंतरदीपक आत्मा आहे आस्त्रवास रोखाया संवर निर्जरेस बळ आत्मा आहे पाप पुण्य कण गळून जाता शाश्वत ध्रुव पण आत्मा आहे

  • नाटक – NATAK (DRAMA)

    जशास तैसे देते परतून ही तर माझी उपजत शक्ती सहज लावते नाटक उडवून ही तर माझी उपजत शक्ती मणी मोजुनी मनी लगावून लगावलीला शेर प्रकटतो ना मी बोले काही ठरवून ही तर माझी उपजत शक्ती काय साधते ऐसे बोलून खोटेनाटे नात्यांमध्ये धर्म अहिंसा पाळे जगवून ही तर माझी उपजत शक्ती आटापीटा करून जिवाचा नकाच पोसू…