परवशता ना पाश माझ्या वसा गळा अंतरी
देऊळी चित्रात साकार सावळा अंतरी
काळ न भोंदू वेळकाढू निकाल सांगायला
तो तर दावे कर्म वर्गणा जुन्या कळा अंतरी
कशास फिरशी सांग बाई अश्या अवेळी कशी
लहरत आहे काळ कर्दन रसा तळा अंतरी
रंगांचा व्यापार क्षितिजी कळी फुले संगमी
मंतरलेल्या चांदण्यांचा झुले मळा अंतरी
गागागा गा गाल गागा लगा लगा गालगा
मात्रा मोजत उघड हृदया मिळव फळा अंतरी