-
अवखळ थंडी – AVAKHAL THANDEE
शिशिरामधली अवखळ थंडी अंगांगाला झोंबत आहे शेकोटीच्या ज्वाळेमध्ये तन मन यौवन नाचत आहे गच्च दाटल्या धुक्यात पक्षी मौन पांघरुन बसला आहे कंठामध्ये अवघडलेल्या गाण्यावरती रुसला आहे पानांवरल्या दवबिंदुंतिल किरण शिरशिरी प्राशत आहे जर्द नव्हाळी गव्हाळ काया उन्हास हळदी माखत आहे सुरभित पुष्पे देहावरती भिजली माती झेलत आहे सरत्या वर्षामधले काही सुंदर क्षण मी वेचत आहे…
-
वीस पंधरा – VEES PANDHARAA
स्वागतास सज्ज मी वीस पंधरा तुझ्या चांदण्यात नाहण्या कृष्ण अंबरा तुझ्या नीलवर्ण पाखरे गात गात चालली चुंबण्यास पापण्या गौर शंकरा तुझ्या सौरभात दाटली मुग्ध मौन प्रीत तू जाणते इथून मी शुभ्र अंतरा तुझ्या पारिजात वेचते सुंदरा झुकून ती कुंतलात झेलते कैक कंकरा तुझ्या मेघनेत गच्च सौदामिनी कडाडते साथ द्यावया नभा सत्य संगरा तुझ्या साधना करीत…
-
अंतरीच्या दीपज्योती – ANTAREECHYAA DEEP-JYOTEE
अंतरीच्या दीपज्योती पाहताना दर्पणी चेहऱ्याला का जपू मी चेहरा तर दर्शनी काय तुझिया आत आहे काय तव ओठांवरी चार बोटे बांधुनीया नाचवीशी तर्जनी प्रकृतीचे बोल जपण्या काल होते मौन मी बोलण्याची आज संधी वाटते मज पर्वणी भरजरी मन-अंबराचा गझलबाला काठ रे मोरपंखी पदर त्याचा रमवितो तुज सर्जनी अष्टद्रव्ये वाहुनी पाटावरी तू मोकळा भावसुमने ठेव थोडी…
-
सुंदरा सोनुली – SUNDARAA SONULEE
सुंदरा सोनुलीला हवा घाल तू तीन पाती फिरूदे असा ताल तू नाचते डोलते बाहुली गोडुली घाल अंगावरी दोरवा शाल तू पाहतो तो तुझ्या लोचनी रोखुनी व्हायचे लीन अन लाजुनी लाल तू कोण मोठे कसे जाहले जाणते केवढा वाटला बावळा काल तू हात हे टोचरे बोचरे कापरे ओढिशी का उगा गोबरे गाल तू चीज आहेच तो…
-
लावला सापळा – LAAVALAA SAAPALHAA
लावला सापळा आज जो तो खरा घातला मी तुला साज जो तो खरा पांढरी कार अन लाल बत्ती वरी खास माझा असा बाज जो तो खरा पकडले कैक मी फोडुनी बांगड्या ओळखे फक्त आवाज जो तो खरा काय सांगू कुणाला करांच्या कळा वाजवी मस्त पखवाज जो तो खरा भंगलेले जरी शिल्प जुळते पुन्हा जाणतो यातले…
-
हरवले नयन बघ श्यामले – HARAVALE NAYAN BAGH SHYAAMALE
हरवले नयन बघ श्यामले मौन हे अधर बघ श्यामले पर्ण हे लाल दो जुळवुनी लावले कुलुप बघ श्यामले पाकळ्या उमलण्या दोन या राहिशी अचल बघ श्यामले चेहरा लाभला तुज खरा देह तव सजल बघ श्यामले तुडविती माणसे ही भुई नेत्र तव सजल बघ श्यामले तू क्षमा धारिणी माय गे स्पर्शिते चरण बघ श्यामले तू धरा…
-
वीतराग ईश्वरा – VEETARAAG EESHVARAA
वीतराग ईश्वरा देच जाग ईश्वरा मंदिरात मूर्त ही ना सराग ईश्वरा पवन लहर शिंपिते मृदु पराग ईश्वरा फुलत राहुदे इथे प्रेम बाग ईश्वरा मज सुनेत्र लाभले दो चिराग ईश्वरा वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१ २१२ = ११