Category: Marathi kaavya

  • भाव खात राहिले – BHAAV KHAAT RAAHILE

    भाव खात राहिले ते सुमार बोलले कर कबूल हा गुन्हा नागिणीस छेडले मी कधीच रे तुझे पाय नाय चाटले कपट माझियापुढे कोणते न चालले लहर मी असूनही वादळास चोपले शस्त्र अस्त्र टाकुनी ते भिकार पांगले वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१ २१२ = ११

  • गझल मीच मानिनी – GAZAL MEECH MAANINEE

    गझल मीच मानिनी तेज वीज दामिनी कंठ हार तन्मणी मी सतार श्रावणी गा ल गा ल गा ल गा वृत्त हे सुकामिनी दीर्घ र्हस्व अक्षरे लग क्रमास जाणुनी हीच ती लगावली मी दिली लगावुनी गात गात मस्त मी लिहित जाय गुंगुनी घे गुलाबजाम हा साखरेत घोळुनी वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१…

  • लिहिते गझल जिथे मी – LIHITE GAZAL JITHE MEE

    लिहिते गझल जिथे मी वाजे नुपूर तेथे कोणीतरी लपोनी येते जरूर तेथे तव नाव झाकता मी हसतोच शेर गाली मग ओळ ओळ माझी लाजून चूर तेथे पाऊस लेखणीच्या डोळ्यांमधून झरता भिजवून चिंब गात्रे नाचे मयूर तेथे शब्दांस वाकवे मी मज शब्द नाचवीती कोणीच ना उरे मग हांजी हुजूर तेथे तू लाख टाळशी पण मक्त्यात मीच…

  • भांडू नये कुणाशी – BHAANDOO NAYE KUNAASHEE

    भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी भांडायला अताशा कोणी कसे न मिळते? स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते जो…

  • माझ्यावरी फिदा ही – MAAZYAAVAREE FIDAA HEE

    माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी ती तोलते मलाही आहे किती शहाणी मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी दचकून जाग आता मजला कधी न येते असते सदैव जागी माझ्यात एक राणी अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती असली पिके विकाया लिहितात ते कहाणी माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप…

  • श्रमण – SHRAMAN

    पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक, वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४ श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे, वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे। वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी, हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे। तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी, बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।…

  • गगनाला चुंबुन आले – GAGANAALAA CHUMBUN AALE

    गगनाला चुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये सीतेला भेटुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये तंबोरा लावित होती पण मजला पाहुन हसली तिजसंगे गाउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये केशरी फुलांच्या बागा बागेत झुल्यावर हसऱ्या रामाला पाहुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये मंदिरी देव नी देवी अन हवेलीतले वारे त्या मरुता प्राशुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये जलदातुन शीतल सुरभित गंधोदक वर्षत होते पावसात नाचुन आले…