-
झळाळणार – ZALAALANAAR
जे असेल पूर्ण सत्य ते सदा झळाळणार दगड मंत्र बोलणार अन मृदा झळाळणार रंग रूप अन स्वरूप प्रकटतील गुण अनेक मुग्ध मौन हर कळीत नव अदा झळाळणार थंड बोचऱ्या हवेत मोहरून शेत रान सावळ्या भुईमधील संपदा झळाळणार मोति आणि पोवळ्यात पारिजात बहरताच रातराणिच्या फुलांत शारदा झळाळणार चंद्र चूर चांदण्यात चंचला झुले हवेत गोरट्या तिच्या करात…
-
आजकाल बोलण्यास – AAJA-KAAL BOLANYAAS
आजकाल बोलण्यास सवड नाय ऐकण्यास कोण का म्हणेल सांग ये निवांत भेटण्यास वेळ ना तयांस अन्न रांधण्यास खावयास पण सदा तयार तेच शर्यतीत धावण्यास खर्च जाहल्यावरी हिशेब चोख ठेवतात गुप्त फुकट जे मिळेल ते बसून लाटण्यास रंगरूप बदलतात हायफाय वागतात जोखती दुजांस फक्त आरशास टाळण्यास टापटीप राहतात लाजतात ते श्रमांस लाजकाज सोडतात फक्त पाय चाटण्यास…
-
फेडणार पाप कोण – FEDANAAR PAAP KON
पुण्य खूप कमविलेस फेडणार पाप कोण कर्मनिर्जरा तुझीच द्यावयास जाप कोण हा पुढे उभाय वाघ तापमापि ही प्रचंड प्रश्न फक्त एवढाच मोजणार ताप कोण बंदुकीत मी कधीच दारु पूर्ण ठासलीय भांडणास रंग हाच ओढणार चाप कोण हा महाल नाहतोय चांदण्यात संपदेत उंबऱ्यात ज्ञानदीप उलथणार माप कोण मंगळास काळसर्प कोंडतोय कुंडलीत सापळा पुरा तयार कोंडणार साप…
-
कालसर्प कुंडलीत – KAAL-SARP KUNDALEET
कालसर्प कुंडलीत त्यास फक्त ठेचणार जो असेल देवळात त्यास नित्य पूजणार बंगल्यात झोपडीत जर फिरे भुजंग साप सर्पमित्र होत त्यास वाटिकेत धाडणार केवडा बनात नाग मस्त राहती निवांत नागिणींसवे तिथेच ते मजेत डोलणार माणसे भिऊन त्यास तो भिऊन माणसांस छेडल्याविना कुणा कधीन सर्प चावणार श्रावणात पंचमीस वारुळास जाय पोर त्या अजाण बालिकेस शिक्षणास जुंपणार वृत्त…
-
चालतेस चंचले – CHAALATES CHANCHALE
चालतेस चंचले उन्हात गीत गात गात पावसात वादळात उग्र शीत गात गात सोड हात हो पुढे भरार उंच क्षितिज पार झेप यान घेतसे तुझीच जीत गात गात नाव चंचला जरी सदैव शांत चित्त शुद्ध वाट चालते सदैव जोजवीत गात गात वाटतात ही फुले सुगंध रंग या जगात सांडतात बरसतात देत प्रीत गात गात हृदय कमल…
-
खास मी – KHAAS MEE
हसेन चंद्र होउनी स्मरेन मधुर तेच मी हवा जरी मुकी मुकी दवाळ कुंद पुष्प मी पुन्हा पुन्हा लिहावयास गझल धुंद नाचरी उधाणता समुद्र लाट गाज मुक्तछंद मी असेल वृत्त बंद वा ललित सलिल झऱ्यापरी रदीफ काफियासवे भरेन त्यात प्रीत मी सतेज बिंब लोचनात पाहुनी निळे निळे सखे झरेन पापण्यांत तृप्त मुग्ध थेंब मी गुरूकुलात मंदिरात…
-
लाठी – LAATHEE
लिही आता बरे काही स्वतःसाठी दुजासाठी लिही थोडे उकलणारे नको मारू फुका गाठी कशाला हा हवा गुंता शिरी लागे गझल भुंगा पुरे झाले अरे भुंग्या नको लागू सदा पाठी कशासाठी गुरे येती कषायांची निवाऱ्याला असे वाटे तयांपाठी उगारावी कलम काठी पुरे आता छुप्या गोष्टी उताराचे वयच खोटे जवळ येई हळू साठी म्हणोनीरे बुद्धी नाठी खरे…