Category: Marathi kaavya

  • अक्षर ओळी – AKSHAR OLEE

    गझल काफिया रदीफ गातो माझ्यासंगे शरीफ गातो उत्सव असुदे अथवा जलसा तीन दले धर्माला पळसा गजल लिहावी अथवा कविता शुद्ध जले वाहूदे सरिता गझल गझाला गज्जल असुदे नीर तयातिल नीतळ असुदे साळुंकी वा म्हण साळुंखी फक्त जाण तू तो तर पक्षी सुंदर देही सुंदर आत्मा हेच सांगते गाता गाता गाणे गाता बाग फुलावी शिंपुन केसर…

  • ऊठ मुला – OOTH (UTH) MULAA

    ऊठ मुला जागा हो सत्वर तुला जायचे बघ कामावर विधी आटपुन भल्या पहाटे प्रसन्न ताजे तुजला वाटे करून कामे लवकर लवकर घरास ये तू बनून अवखळ आनंदाने हसत राहशिल जीवन जगण्या फ़ुलशिल खुलशिल आता ना मज कुठली चिंता आत्म्यामध्ये तू भगवंता

  • धर्म दिगंबर जैनांचा – DHARM DIGAMBAR JAINANCHAA

    टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा लेन्स असूदे अथवा…

  • खरेच आहे – KHARECH AAHE

    बुडत्याला आधार कडीचा खरेच आहे मला वाटते जुने लिहावे बरेच आहे स्वभाव अपुला आपण जपतो असेच आहे आत्मा म्हणतो जे आहे ते तुझेच आहे श्वान भुंकतो कारण त्याचे तेच बोलणे रोज भुंकणे जरी तेच ते नवेच आहे बाळ बोबडे बोले काही खिदळत नाचत कौतुक करण्या म्हणते आई खुळेच आहे क्षेत्र आपुले जपण्यासाठी धडपड असते तिला…

  • पाउस सरी – PAAOOS SAREE

    रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे…

  • कविता – KAVITAA

    कविता असुदे वाकडी अथवा सरळ किंवा वेलांटीदार वळणा वळणाची ! तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं ! तिचं सरळपण साधावं तिची मोहक वेलांटीदार वळणे आपणही घ्यावीत… वेलांटीत वाकावं, उकारात उडावं ! काना मात्र्यात टिपावं चिंब भिजलेलं मन ! मग नकळत हसावं विसर्गात अधर  किंचित वक्र करून ! कविता असतेच एक हलकी मोळी गझल वृत्तात बांधल्यास होते…

  • बिजली बाला – BIJALEE BAALAA

    मीही घडले तीही घडली तोही घडला हाही घडला … आपण घडलो घडले सारे कधी पडताना घडले मीरे दिवसा मोजीत होते तारे ! भिजवून गेले सुगंध वारे अशीही घडले तशीही घडले घडता घडता कधी बिघडले ! हमसून हमसून मीही रडले… पिंजऱ्यातले बंद हुंदके फुटल्यावरती मौक्तिक बनले नक्षत्रांची नव्हती माला नव्हता मृग अन चित्रा स्वाती ! तरीही…