Category: Marathi kaavya

  • गारवा – GAARAVAA

    केळी द्राक्षे दहिभाताचा धाड गारवा तोलायाला वजने मापे एक ताजवा बसून जेवण करण्यासाठी अंथर चटई असेल जेथे थंड जलाचा स्वच्छ कालवा मिरचीठेचा उसळ मुगाची झुणका भाकर चवीचवीने खाइल चिमणी द्वाड पारवा गाजर-हलवा चिक्की बर्फी पानसुपारी देउन तिळगुळ नात्यांमधला जपू गोडवा किलबिल करतिल मुले पाखरे झाडांभवती फुलेल मोहक कळ्याफुलांचा शुभ्र ताटवा

  • सोने खरे रे – SONE KHARE RE

    सोपे दिसे रे अनवट कसे रे कोडे पडे रे नाते नवे रे नकळत फुले रे व्हावे खुले रे आहे जुने रे अवघड कुठे रे सोने खरे रे मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)

  • कोंडा मळ तू – KONDAA MAL TOO

    कोंडा मळ तू बडव बडव तू मांडे तळ तू वाती वळ तू तबक सजव तू पूजा कर तू पक्षी बन तू किलबिल कर तू गाणे म्हण तू मात्रावृत्त(४+२+२=८ मात्रा)

  • धोंडा होते मी – DHONDAA HOTE MEE

    पारा होते मी बघ ओघळले मी धारा झाले मी किल्ला होते मी पडले झडले मी पाया झाले मी कारा होते मी तुटले फुटले मी वारा झाले मी तारा होते मी चपला बनले मी उल्का झाले मी ओढा होते मी भिजले भरले मी दाता झाले मी काया होते मी हसणे शिकले मी आत्मा झाले मी साकी…

  • रच हइकु – RACH HAIKU

    रच हइकु दिडकि  चवलित भवन विकु हसणं शिक करित चुरुचुरु मडकं विक कडक सुकं बघुन सरपण रच सरण धरुन दम हसत खिदळत दळ दळण हलव कर कढइत उथळ तळ तळण वर कठिण अवघड वळण चढ चढण खुड पळस सजवुन कळशि कर कळस म्हण शरण करित कुरकुर धर चरण नविन घर मधुर तिळगुळ बशित भर

  • शाळा – SHAALAA

    प्राण्यांची भरली शाळा पक्षी झाले गोळा त्यांनाही दिली जागा फुलांच्या रंगीत बागा प्राण्यांना दिले पटांगण त्यांनी केले रिंगण खेळ खूप खेळले खेळामध्ये दंगले आकाशी उडाले पक्षी सुंदर हवेत नक्षी पक्षी आले रिंगणावर खाली उतरले भराभर त्यांनी आणला फळा शाळेला लागला टाळा

  • अंगण गाणे – ANGAN GAANE

    चलागं  पोरींनो गाऊया अंगणी रांगोळी काढूया रेषेतं  ठिपके मांडूया कलेकलेने जोडूया चित्रातं  घरकुल सजवूया घरासं  खिडक्या ठेवूया दारासं  तोरण बांधूया गाईची पाऊले रेखूया गाईला गोठ्यात आणूया वासरां जवळ घेऊया दोघांना चारा घालूया झऱ्याचं  पाणी पाजूया अंगणी रातीला जमूया उखाणे सुंदर गुंफूया झिम्मा नी फुगडी खेळूया चंद्राचं चांदणं पेरूया