लोकापवाद ठोक साक्षीस ठेव आत्मा
बघतात फक्त लोक साक्षीस ठेव आत्मा
सोडून देश प्रांत येतात पाहुणे खग
झुंजार माळढोक साक्षीस ठेव आत्मा
जाणावयास भेद संस्कृत प्राकृतातिल
नमिऊण स्तोत्र घोक साक्षीस ठेव आत्मा
सम्मेद शिखरजीस निर्वाण वीस टोके
अंतीम पार्श्व टोक साक्षीस ठेव आत्मा
दृष्टीस माय नाव दिधले स्वतः “सुनेत्रा ”
पुरुषार्थ साध्य झोक साक्षीस ठेव आत्मा