सत्य सांगुनी शांती मिळते.
सत्य उघड कर सुयोग्य वेळी मिळण्या शांती.
सत्य हेच कि अनुभव मोठा गुरु आपुला.
सत्य असे जी स्तुती पोचते सहज अपुल्यापाशी.
सत्य धर्म आर्जव आणि मार्दवात रे.
सत्य जाणल्यावरती संयम खरा धर्म रे .
सत्याला कळते लवकर हे लघु होण्यातच सुख आहे रे .
सत्य जाणुनी ज्ञान वाढते अभिमानाला संपवते .
सत्य जाणुनी साठीनंतर,
पंचेंद्रिय विषयांस टाळणे,
धर्म आत्म्याचा.