-
सोवळे – SOVALE
दोन रुबाया स्वातंत्र्य… स्वातंत्र्य प्रिय मज अम्हा तुम्हा हर जीवा ना मात्रा अक्षर अडकविती मम जीवा संपले प्रश्न हे गूढ मूढ छळणारे व्हावयास राख पाप कर्म जळणारे सोवळे… सोवळे उतरवलेय ओवळे नेसायाला का लाऊन घ्यावे अंगा वल्कल नेसाया नेसते रुबाई नऊवार पैठणी इरकल खांद्यावर शाल गझल जणु ढाक्याची मलमल
-
कोसला – KOSALA
प्रीतकी जंजीर हो या अभिमानका खंजीर, भाषा ब्रह्मांडकी हो या पिंडकी, धर्म राष्ट्रका हो या देशका,अथवा प्रादेशीक.. हृदयका धर्म प्रेम होता हैं … दोन रुबाया १) कोसला.. होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या घोळात रुबाई मात्रांच्या पण येई स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई… २) पाकळी मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता दवबिंदुत भिजुनी…
-
बंधन -BANDHAN
खेळ मांडावा धरावा पकडण्यासाठी पकडलेले सोडताना पडू नये कोणी भाव आहे आर्जवाचा घडवण्यासाठी जे हवे ते घडत जाता झडू नये कोणी मुक्तछंदातून बंधन बहरते आहे भूतकाळाच्या तणावर नडू नये कोणी वाडवडिलांची खरी रे पूर्वपुण्याई साथ मिळता प्रीतिची खडखडू नये कोणी झरत जाता शेर ऐसे निर्झरावाणी सावळ्या गझलीयतेला खुडू नये कोणी कोणत्या गोष्टीत माझ्या नाव अपुले…