-
अप्रतिम – APRATIM
रंग संगती अप्रतिम वन हरिण सती अप्रतिम कर्म तपवून जाळण्या अंगार मती अप्रतिम योग भक्तिचा जिनांच्या ध्यानात रती अप्रतिम पंथ असो कोणताही दिगंबर यती अप्रतिम श्रीमती गुण कुमारिका सौभाग्यवती अप्रतिम
-
झुंजार – ZUNJAAR
तरही लिहील्यावर कधीही भ्यायचे नाही श्रेयास दुसऱ्याच्या फुका लाटायचे नाही झुंजार ही मम लेखणी लढते पिशाच्चाशी खड्डा खणोनीया तिला गाडायचे नाही वय जाहल्यावरती जरा संयम असावा हो पचण्यास जे अवघड असे ते खायचे नाही तरही डिलीट करून व्हावे मोकळे वाटे ऐसे विकतचे दुःख मज ठेवायचे नाही धर्मास ऐश्या पाळणे ज्याची नशा सम्यक जगण्यात मिथ्यात्वा सुनेत्रा…
-
निहार – NIHAR
शिशिर ऋतूतील पहाट भासे हवा मुखातील निहार भासे चार चरण यूत चारोळी वा स्वर काफियातिल मुक्तक भासे डावी असूदे अथवा उजवी सात बाराचे शिवार भासे कृष्णा माझी दुहिता मंडीत मूर्त मनातील सुकण्ण भासे नूरजहां मी अनुजा सुनेत्रा तिप्प तनूतील नहार भासे
-
छल्ले – CHHALLE
मोरपिशी शालूवरी .. छल्ले चांद पंखी ….. पदरा निळे गोंडे गडद .. निळी वेलबुट्टी ….. काठ निऱ्यांचा ग घोळ .. पावलात लोळे ….. जास्वंदीचे पुष्प पर्ण.. चाफ्यासंग डोले….. मोतिमाळ बोरमाळ .. तीन पदर सरी ….. कवडी माळ काळी पोत .. गळेसर लडी ….. चाफेकळी नाक भाळी .. हळदी कुंकू टिळा ….. अधर बंद पाकळ्यात ..…
-
लोचना – LOCHANA
पर्ण दोन झळकतात जोडवी किनार दो चरण कृष्ण उमटतात पावले जलात दो मूर्त स्वरुप भावभोर सावळी जमीन ही धरण इंद्र बांधतोय जांभळ्या सुरांवरी गाल गाल गालगाल गालगा लगाल गा गालगाल गालगाल गालगाल गालगा हीच रे लगावली किती सुरेल भावना आवडेल का तुला नवीन गझल लोचना साधनेत पूजनात दंगलेत जीव हे प्राकृतीक मंदिरात शिल्प ना घडीव…
-
पडघम – PADAGHAM
फुका न वाजे नकार घंटा गझल न माझी सुमार घंटा लगाल गागा गतीत चाले कुशाग्र बुद्धि तलवार घंटा नव्हेच कासव नसे ससा पण नसून भित्रा पगार घंटा न माळ कवडी मिळे न फुटकी जरी बडविल्या उधार घंटा हुमान फुसके नकाच घालू रुते कलेजी कट्यार घंटा जिथे जिथे मम जिनालये ही धरेल ठेका कुंवार घंटा सुरेल…
-
असूदे -ASOODE
कान भरणारे असूदे काम करणारे असूदे खोल बुडणारे असूदे बुडून तरणारे असूदे लिहित जाता गैर काही कान धरणारे असूदे मीच माझे कर्म बांधे साक्ष बघणारे असूदे काय कोठे फरक पडतो हात धरणारे असूदे खायचे त्यांचेच त्यांना कैक तळणारे असूदे मी सुनेत्रा स्वाभिमानी लाख जळणारे असूदे