सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • श्रमण – SHRAMAN

    पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक, वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४ श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे, वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे। वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी, हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे। तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी, बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।…

    November 12, 2014
  • गगनाला चुंबुन आले – GAGANAALAA CHUMBUN AALE

    गगनाला चुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये सीतेला भेटुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये तंबोरा लावित होती पण मजला पाहुन हसली तिजसंगे गाउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये केशरी फुलांच्या बागा बागेत झुल्यावर हसऱ्या रामाला पाहुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये मंदिरी देव नी देवी अन हवेलीतले वारे त्या मरुता प्राशुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये जलदातुन शीतल सुरभित गंधोदक वर्षत होते पावसात नाचुन आले…

    November 12, 2014
  • तू सोन्याची पुतळी मृदुले – TOO SONYAACHEE PUTALEE MRUDULE

    तू सोन्याची पुतळी मृदुले कंठसाज वर गजरे झुकले अंगठीतले खडे दावती तव नयनांतिल बिंब चंचले तुझ्या अंगुली बोलत असता गोठ पाटल्या बिलवर भिजले दंडी वाक्या रुतून बसल्या गौर भाल बिन्दीने सजले कमर मेखला कनक कळ्यांची तुला वेढुनी बसली गझले गझल (८+८ = १६ मात्रा)

    November 12, 2014
  • ये भांडू आता थोडे – YE BHANDOO AATAA THODE

    ये भांडू आता थोडे गोडीने साखर वाढे कंटाळा आला मजला चल पाठ करूया पाढे घालून घाव चोचीने पिंजरा शृंखला तुटता फांदीवर पोपट झुलतो खावयास पेरू दाढे तू घाल जरासे पाणी भांड्याच्या आत तळाला करपेल विस्तवावरती मम क्षीरच निरसे गाढे परसातिल बागेमध्ये लावूत औषधी झाडे काढूया अर्क मुळांचा बनवाया अस्सल काढे दे काम अता तू त्याला…

    November 11, 2014
  • मी इळभर लिवले शिवले – MEE ILABHAR LIVALE SHIVALE

    मी इळभर लिवले शिवले पर कागुद चिंधी झाला ती उनाड मैना कावुन शबुदाचा करती काला त्यो पान खाउनी थुकला मी हुशार हाये म्हणला मंग मीबी बोल्ले लिवरं त्यो चघळत बसला पाला म्या कायबाय गिरगटलय त्ये चिडलं तरिबी हासतय खट दाजी सरकिट येडा अन खासा दिसतुय साला गझलच्या जिमीनीमंदी मिरचीचा वाफा सजला ये तोडू लवंगि मिरची…

    November 11, 2014
  • ती साद माउची येता – TEE SAAD MAAUCHEE YETAA

    ती साद माउची येता थरथरली काया सुंदर गझलेच्या वृत्तामधुनी सळसळली काया सुंदर जो उपजत फुलून आला तो अभिनय खराच होता श्वासाला रोखुन धरता झरझरली काया सुंदर भावना दाटुनी आल्या लेखणी हरवली होती पण जवळ संगणक बघुनी टपटपली काया सुंदर वादळी रात अवसेची घनमाला पिसाटलेल्या त्या रात्री वीज बनोनी लखलखली काया सुंदर मी फक्त ‘सुनेत्रा’ आहे…

    November 10, 2014
  • सोनार कुशल मी झाले – SONAAR KUSHAL MEE ZAALE

    सोनार कुशल मी झाले दागिन्यात मढण्यासाठी अन पाथरवटही झाले मूर्तीस घडविण्यासाठी धगधगत्या ज्वालेमध्ये काहिली तनूची होता मी रान जिवाचे केले पावसात भिजण्यासाठी दगडाच्या भावामध्ये विकताना पाहुन रत्ने मी रत्नपारखी झाले अंगठ्या बनविण्यासाठी घामाने शिंपित गेले कागदी मळा काव्याचा थंडीत बोचऱ्या फिरले घामास जिरविण्यासाठी मज घाम पुसायालाही सवड ना मिळाली जेव्हा ते निरखित मज बसलेले दोषांना…

    November 10, 2014
←Previous Page
1 … 156 157 158 159 160 … 273
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya