-
निर्मल ‘मी’पण सदा असूदे – NIRMAL ‘MEE’PAN SADAA ASOODE
शस्त्र असूदे वार कराया प्रहार करण्या गदा असूदे स्वभाव अपुला सदैव जपण्या निर्मल ‘मी’पण सदा असूदे आत्मा ईश्वर वा परमेश्वर शुद्ध स्वभावी खुदा असूदे ढळू नये मम सम्यकश्रद्धा दुःख व्यथा आपदा असूदे ओळख नसते जरी कुणाची तरी वाटते ओळख आहे ओळख जपणे नात्यांमधली हीच खरी संपदा असूदे पुरे जाहले वृत्त घटविणे मोजित मात्रा शब्द पेरणे…
-
असाच वेडा पीर हवा – ASAACH VEDAA PEER HAVAA
अमोघ माझा धीर असा सुवर्णपाती तीर जसा असेल बिंदू लक्ष्य जरी अचूक भेदे मीर तरी करात नाही शस्त्र गदा लढेल ऐसा वीर सदा खणेल कोणी खाण तिथे झरेल वाणी नीर इथे विवेक सिंधू साठवितो जलातले तो क्षीर पितो स्फुरेल ज्याला मंत्र जगा असाच वेडा पीर हवा वृत्त – ल गा ल गा गा, गा ल…
-
कोडे – KODE
पाय का हे पोळताती घातले जोडे तरी का न तृष्णा ही मिटे रे नीर ही गोडे तरी धावती हे लोक म्हणुनी धावशी वेड्यापरी ऐकण्या गुज अंतरीचे थांबना थोडे तरी बैसले घोड्यावरी मी सैर करण्या डोंगरी का अडे मन पायथ्याशी दौडते घोडे तरी मूढ मी होते खरी अन गूढ त्या होत्या जरी प्रेमगोष्टी भावल्या मज वाटल्या…
-
आज मी नाहीच तेथे – AAJ MEE NAAHEECH TETHE
श्वास त्यांचा मोकळा झाला परंतू… आज मी नाहीच तेथे जाणत्यांची वाहते भाषा परंतू … आज मी नाहीच तेथे फोडण्या नेत्रांस माझ्या लेखणीने… आंधळे सारे निघाले पोचले ते माझिया गावा परंतू … आज मी नाहीच तेथे वादळी मेघांपरी ते वर्षताना… मंदिरी वाजेल घंटा अंतरीचा नाद तो माझा परंतू… आज मी नाहीच तेथे गोठल्या आकाशगंगा गारठ्याने… गोठला…
-
सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR
आज दिवस सौख्याचा सुंदर उजळुन जाईल मनीचे अंबर किणकिण मंजुळ गाईल झुंबर हसेल मम नेत्रांचे मंदिर सर पुण्याची येईल सरसर पापांची मग मिटेल घरघर शुद्ध सरींनी भिजेल अंतर निसर्ग गाणे म्हणेल सुंदर सुंदर सुंदर अतीव सुंदर
-
कान-कावळा – KAAN-KAAVALAA
कधी कधी मी टांगेवाली कधी कधी अन भांडेवाली भांडेवाली मी नखर्याची करे धुलाई हर पात्रांची कधी डोईवर घेउन हारा विकते भांडी दारोदारा सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा तेल भराया कान-कावळा तेलाने जेंव्हा कळकटतो जोर लावुनी घास घासते धरुन नळाच्या धारेखाली स्नान घालते त्यास सकाळी तयात ओतून गोडेतेला नीट ठेवते वरी टेबला बांधुन बुचडा मग केसांचा फडशा…
-
दिसू लागला – DISOO LAAGALAA
दिसू लागला स्वच्छ किनारा ध्वज फडफडणारा दिसू लागला शांत किनारा बेटावर किल्ला दिसू लागला बुरूज दगडी माडांची वाडी दिसू लागल्या काजू बागा करवंदी मेवा पाण्यावरचा तरंग इथल्या गात पुढे जावा हरेक अधरांवरती वाजो हृदयातिल पावा जीव येथल्या मातीमधला मोक्षाला जावा प्रेमामध्ये सौख्यामध्ये चिंब चिंब न्हावा