-
सण मनभावन – SAN MANBHAAVAN
हिरव्या पानी फुलेल फुलवा सुगंध उधळित हसेल मरवा सतेज हळदी कुंकुमवर्णी प्रीत प्राशुनी भरेल गडवा मंदाग्नीवर मृदुल करांनी काटेरी घन खुलेल हलवा गोड हासऱ्या लेकींसाठी फांदीवरती झुलेल झुलवा अनुरागाचे गीत गुलाबी रागामध्ये सुरेल बसवा सत्त्यासाठी प्रेमासाठी सैनिक अमुचा लढेल कडवा वाण लुटाया संक्रांतीचे सण मनभावन असेल बरवा मात्रावृत्त (८+८=१६)
-
झाडांसंगे करून मैत्री – ZAADAANSANGE KAROON MAITREE
झाडांसंगे करून मैत्री चला गाउया गाणे चिमण्यांसाठी स्वच्छ अंगणी भरड पाखडू दाणे शकुन सांगण्या रोज कावळा उडून येता दारी न्याहरीस मग देऊ त्याला गरमागरम भाकरी गच्चीमध्ये रान पारवे नाचत येती जेव्हां वाढू त्यांना चघळायाला कडधान्याचा मेवा तहानलेला पक्षि अनामिक बनुन पाहुणा येता वाडग्यातुनी पाणी देऊ नाश्त्याला पास्ता सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोके घेऊ दिवा लावुनी देवापुढती…
-
चित्र रेखाटिता – CHITR REKHAATITAA
चित्र रेखाटिता हरित पावलांनी नाव ही रेखिले मृदेच्या कणांनी उच्छवासापरी धुराडे चुलीचे ओकते काजळी भरोनी ढगांनी आरसा पाहुनी नटावे सजावे स्वप्न डोळ्यातले गुलाबी क्षणांनी गंध मातीतला मिळाला हवेला शिंपिता अंगणी सडा या घनांनी लागले भृंगहे इथे ते घुमाया काव्य शाकारता कळ्यांनी फुलांनी वृत्त – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, ल गा…
-
तहान – TAHAAN
हवा पावसाळी उदास उदास तरी कुसुम उधळे सुवास सुवास जिथे रम्य संध्या पहाट दुपार निशा मस्त तेथे झकास झकास जसा धावणारा जळात तरंग तसा भावनेचा प्रवास प्रवास उडाया झुलाया खुले घरदार तिथे पाखरांचा निवास निवास म्हणे कोण तृष्णा तहान तयास किरण चुंबणाऱ्या दवास दवास लढे जो कराया स्वतःस स्वतंत्र करे कैद कैसा खगास खगास वृत्त…
-
थोडी नाही थोडी नाही – THODEE NAAHEE THODEE NAAHEE
थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी म्हण तिला लाडे लाडे शाणुबाई उठा इग्गो बिग्गो अग्गो असला सोडा खुळचटपणा आवाजात भसाड्या गाणे गुणगुणा ठोकून द्या थाप म्हणा हाच राग तोडी… थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी शेजारणीशी जोरजोरात करा गप्पाटप्पा उघडून टाका मनाचा कुलूपबंद…
-
श्याम सुंदर सावळा – SHYAAM SUNDAR SAAVALAA
माळ गुंफण्या पोवळा घर बनविण्या ठोकळा खाण्यासाठी ढोकळा घाऱ्या करण्या भोपळा खीरीसाठी कोहळा तुरट आंबट आवळा गोड मोर-आवळा बाळ मनाचा मोकळा श्याम सुंदर सावळा
-
भाग्यशाली फणी – BHAAGYASHAALEE FANEE
साद घाली कुणी सुनेत्रा सुनेत्रा नाव ध्यानी मनी सुनेत्रा सुनेत्रा आसवांनी खऱ्या फळावे गळावे भावना घुसळुनी सुनेत्रा सुनेत्रा प्रेम होते जरी कसे ना कळाले मिळव ते देउनी सुनेत्रा सुनेत्रा सर्व काही तुला मिळाले उशीरा पण तरी हो ऋणी सुनेत्रा सुनेत्रा पूर्व पुण्याइने मिळाली क्षमेची भाग्यशाली फणी सुनेत्रा सुनेत्रा मेघ गातीलही अता पावसाळी शब्द हे वर्षुनी …