-
पंचप्राण मम जाहले – PANCHAPRAAN MAM JAAHALE
पंचप्राण मम जाहले, पंचभुतांवर स्वार। जिनवाणीला प्राशुनी, करेन हा भवपार। विषय वासना भावना, छळोन मजला फार। धरेन भगवन मस्तकी, शुद्ध भक्तिची धार। खरेपणाचे शस्त्र हे, परजिन त्याची धार। मिथ्यात्वावर घातकी, चालवेन तलवार। हृदय मंदिरी मूर्त ही, गळ्यात मौक्तिक हार। स्वागत करण्या प्रीतिचे, सदैव उघडे दार। मात्रावृत्त (१३+११= २४ मात्रा)
-
आठवण – AATHAVAN
Aathavan means memory. Here poetess tells us about her sweet memory. तुझी म्हणाया नको वाटले म्हणून तिजला निळी म्हणाले निळी जाहल्यावरती तिजला किती किती तू खुळी म्हणाले खुळी जाहल्यावरती वेडी सैरावैरा पळू लागली आवरता तो नाच तिचा मग गात्रे माझी थकू लागली आठवण जरी ती तुझीच होती कैक आठवणी गाऊ लागल्या रंगबिरंगी हार बनूनी गळ्यात…
-
रात्र सरावी – RAATR SARAAVEE
This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is GAA GAA GAA GAA, GAA GAA GAA GAA. शुभ्र मृदू फुलवात वळावी हीच नवी सुरुवात ठरावी भिजवुन वाती शुद्ध घृताने मम ठिणगीने ज्योत फुलावी धवल कळ्या घन समईमधल्या पेटत जाता रात्र सरावी सम्यक्त्वाची नजर मिळाया माझी काया पणती व्हावी देव्हाऱ्यातिल शुचिता जपण्या आज ‘सुनेत्रा’ खास दिसावी…
-
कळते वळते – KALATE VALATE
This ghazal is written in maatraavrutt(32 matraas). Here Radeef is valate(वळते) and kaafiyaas are kalate, falate, jalate( कळते, फळते, जळते) etc. नीर क्षीर जे विवेक जपती त्यांची भाषा कळते वळते कुरुप मनाची कुरुप गोष्टही त्यांच्यासंगे फळते वळते शब्दांमध्ये भरून कटुता कुणी भिजवुनी तयांस पिळता पीळ काढुनी ऊन देउनी वीष त्यातले जळते वळते मधुर भावना मुग्ध…
-
वनहरिणी – VANAHARINEE
This ghazal is written in maatraavrutt. Here radeef is Malaa( मला ) and kaafiyaas are laagel, vaatel, saangel(लागेल, वाटेल, सांगेल) etc. इतुके रोखुन पुरे पाहणे, नजर तुझी लागेल मला जरी रांगडी मी वनहरिणी, लाज किती वाटेल मला रोमांचांनी फुलेल काया, बघता बघता बिंब तुझे अन हृदयीचा दिडदा दिडदा, मंत्र णमो सांगेल मला जलवंती मी निर्झरबाला,…
-
सुनेत्रा – SUNETRAA
This ghazal is written in akshargan vrutt. vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. तुला मी मला तू अता आवडावे तुझे नाव माझ्या पुढे मी लिहावे जुनी प्रेमपत्रे गुलाबी मनाची वहीतून फोटो बुके पाठवावे पुराणातल्या त्या कथा वाङ्मयाचे दुधी वांगियासम भरित मी करावे जिला ना कळाली अहिंसा फुलांची…
-
तुझी भावली मी – TUZEE BHAAVALEE MEE
तुला भावलेली तुझी भावली मी तिची कैक रूपे तुला दावली मी कधी नोट कोरी कधी येन डॉलर अधेली रुपाया कधी पावली मी पहाटे सुगंधी मृदू साद येता मधुर लाजलेली गुलबकावली मी कुमारी सडा शिंपिता सांजवेळी तिच्या अंगणी रंग-पुष्पावली मी गळाभेट होता नव्या जाणिवेची दिवाण्या मनाची निळी सावली मी वृत्त – ल गा गा, ल गा…