वाघीण बैसलेली चित्रात एक शांत
आकाश चन्द्र शीला झुंजार लेक शांत
मौनातल्या गुहेचा आधार कोण सांग
सत्यास कोण वाली देणार चेक शांत
लेकास ल्योक बोली भाषेत शब्द जाण
त्या इंग्रजी तळ्याला म्हणतात लेक शांत
कोणास आठवेना केलेय पाप मोप
त्याला न माप काही खातीच फेक शांत
चोरी इथे पहाटे करतात शब्दचोर
करतातअंधभक्ती करिती रिमेक शांत
दर्यास वर्तमानी कुठले भविष्य भूत
देऊन साक्ष खोटी झाले अनेक शांत
नावातल्या सहीत सुनेत्रा अनेक कांत
स्याद्वाद जैनियांचा म्हणतात कैक शांत