-
आवाज – AAVAAJ
आवाज माझा आतला काट्यावरी मी तोलला तो कोण होता पाठिशी सांभाळ मजला बोलला मौनात होता आरसा मी फोडता पण वाजला रानात धेनू हंबरे ऐकून स्वर मुरलीतला येताच भरती सागरा तो लाट बनुनी गाजला सोडून होडी हातची पाण्यात तो झेपावला मम भावना भवनाशिनी वाचून तोही थांबला वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…
-
सामना – SAAMANAA
टोकावरी जाऊ नको गेल्यावरी नाचू नको थांबून तू न्याहाळ ते टोकात पण गुंतू नको करशील जेव्हा सामना नजरेस तू टाळू नको आरास तू केली जरी ते मुखवटे घालू नको ओढावया नाकास तव हातामधे देऊ नको जे पाप पुन्हा उगवते जाळून ये गाडू नको कमरेस जे गुंडाळले डोक्यास गुंडाळू नको वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली…
-
वेंधळी – VENDHALEE
चंद्रावरी हे पोचले ते मंगळाशी भांडले असुनी कुरूप नि वेंधळी मजलाच त्यांनी निवडले येताच त्यांच्या आड तो सूर्यास त्यांनी रोखले नक्षत्र ताऱ्यांना कसे भंडावुनी मी सोडले होते किती मतिमंद ते वातात कोणी बरळले गर्विष्ठ मी आहे जरी बारा कसे ना वाजले सांगा सुनेत्राला खरे म्हणताच का ते कोपले वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली –…
-
तीळपोळी – TEEL POLEE
बाभूळ छाया लांबली काट्यांसवे शेफारली मउ तीळपोळी सानशी साऱ्यांमधे मी वाटली सैलावली अभ्रे नभी पाठीवरी मी टाचली गालावरी पडता खळी तो न पण ती लाजली माझी न त्याची ती परी त्याचीच वाटे सावली गौरीपरी हिमगौर ती आहे छबेली बाहुली माझी सुनेत्रा वासरी टोचून काटे फाडली वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल…
-
पावित्र्य – PAAVITRYA
त्या लाडक्याला संपवू अन दोडक्याला गोठवू आभाळमाया दाटली मायेस तिचिया आठवू झोळीतल्या तान्ह्यासवे त्या द्वारकेला जोजवू आकाश आता मौन ना त्यालाच पुन्हा पेटवू आकाश जेव्हा बरसते त्यातील ठिणग्या साठवू काया जरी ती नागडी पावित्र्य त्यातिल दाखवू तृष्णा सुनेत्रा ना जरी हृदयास कोमल गाजवू वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…
-
पुस्तके – PUSTAKE
मूर्तीस त्या पाहून ये नागासवे डोलून ये ज्या घातल्या शपथा तुला त्या सर्व तू माळून ये जी पुस्तके मी वाटली ती पूर्ण तू वाचून ये अभिषेक तू केला जरी ती नग्नता जाणून ये जे बांधती तुज सारखे ते हात तू बांधून ये जे पत्र तू नाही दिले पत्रास त्या घेऊन ये जे रंग माझे लपविले…
-
तथास्तु – TATHAASTU
उधाणल्या सागरात तारू अजून माझे टिकून आहे सुन्या तुझ्या भैरवीत कोणी उदासवाणी बसून आहे दहा दिशा मोकळ्या मला या खुणावतो आसमंत सारा नभात अभ्रे फुलून येता तयामधे मी भरून आहे तहान तृष्णा तुला तिलाही कुण्या सुरांची तिलाच ठावे मुक्या मुक्या लावणीतला हा तरूण ठेका रुसून आहे तुझे नि माझे अगम्य नाते कुणास बेडी कुणास कारा…