-
ऐकेन आज काही – AIKEN AAJ KAAHEE
ऐकेन आज काही पण बोलणार नाही शब्दांस काव्य भरल्या मी छाटणार नाही सांगून टाक हृदयी कुठले रहस्य दडले ऐन्यात त्यास लपुनी मी पाहणार नाही जाई जुई चमेली चाफा नि मोगऱ्याला टोचूनिया सुईने मी गुंफणार नाही झाकून नेत्र दोन्ही ऐकेन देहबोली डोळ्यात भावनांना मी शोधणार नाही आताच पावसाचे मज बंद पत्र आले उघडून त्यास सुद्धा मी…
-
मेघदूत MEGH DOOT
-
मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR
मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…
-
नेणिवेची चारुता (THE BEAUTY OF SUBCONSCIOUS)
जाणिवेची जागृती मम नेणिवेची चारुता मजजवळ सौंदर्यदृष्टी आत्मियाची शुद्धता गातसे सौंदर्य माझे वाहते गात्रातुनी मी फिदा माझ्यावरी मज शोभणारी मुग्धता पाहशी तू मजकडे अन मी तुझी होतेच रे मौन तू घेशी जरी रे जाणते मी रम्यता रोखुनी मी पाहते अन गाळुनी मी ऐकते बोलते मी नेमके अन जाणते तव सौम्यता जोडले नाते मनाने भूतकाळा जाणण्या…
-
अंतरीचा सोनचाफा – ANTAREECHAA SONCHAAFAA
अंतरीचा सोनचाफा तू तया पाहून घे सौरभाला लूट त्याच्या कुंतली माळून घे कुंतलांना सांग कुरळ्या वारियावर लहरण्या मोकळे होऊन त्यासम मस्त तू गाऊन घे नीर शीतल साठलेले लिंब हो काठावरी चंद्रकिरणांच्या सरींनी चिंब तू न्हाऊन घे सोडुनी पाण्यात पाया बैस तेथे क्षणभरी विसरलेल्या पैंजणांना तू पुन्हा बांधून घे बिंब तव पाण्यात सुंदर पाहुनी आश्चर्य का…
-
अनोळखी – ANOLAKHEE
-
तिन्हीसांज – TINHEESAANJ
सकाळी दुपारी लिहावी गझल तिन्हीसांज होता स्मरावी गझल गझल रडव रडवी कधी गाउनी हझल मग लिहावी पुसावी गझल रदीफास टाळे गझल जेधवा म्हणे काफिया मग हरावी गझल पहाटे प्रभाती सकाळी सजल दवाने उन्हाने नहावी गझल लहर वारियाची अधर चुंबिता मिटावी फुलावी झुलावी गझल नयन कारण व्हावी तनू कापरी तिच्या कंपनांनी टिपावी गझल झरझरा खिरे ज्ञान…